Breaking News
जाफराबाद तालुका

सोशियल डिस्टंसिंग राखुन अकोलादेव मध्ये पोळा सण साजरा

अकोलादेव / बि. डी. सवडे

जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे दर वर्षी प्रमाणे साजरा होणारा पोळा यंदा मात्र कोरोना च्या सावटाखाली साजरा करण्यात आला. कोरोना व्हायरस या महामारीने संपुर्ण जगात धुमाकूळ घातला असुन भारतात याचे लोन ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने या रोगाचा जास्त फैलाव होऊ नये या धर्तीवर आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांनी योग्य ती खबरदारी घेऊन शासनाच्या गाईड लाईन चे पालन करून यंदा साजरे होणारे सर्वच सण घरी साजरे करण्याचे निर्बंध घातले असल्याने नागरीकांनी सुध्दा पोलीस प्रशासनाला सहकार्य करुण बैल पोळा सण गावात न भरवितात घरीच साजरा केला.

टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सपोनि ज्ञानेश्वर पायघन, पीएसआय ज्ञानेश्वर साकळे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या ४४ गावात पोलीस व्हॅन द्वारे जण जाग्रुती केल्याने शेतकऱ्यांनी बैल पोळा हा सण घरीच साजरा केला. अकोलादेव येथे उप सरपंच डॉ रामेश्वर सवडे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष किसन सरकार, पत्रकार बि. डी. सवडे, योगेश सवडे, देविदास कदम, समाधान गवळी, बिट जमादार एन बी गिराम यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक