भोकरदन तालुका

आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते मयत कृष्णा संजय जाधव यांच्या वारसास 4 लक्ष रुपयांचा धनादेश देवुन केले सात्वन

आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते मयत कृष्णा संजय जाधव यांच्या वारसास 4 लक्ष रुपयांचा धनादेश केले सात्वन

मधुकर सहाने : भोकरदन

मागील आठवडा भरापासुन भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यामध्ये संततधार पाऊस चालु आहे. त्यामुळे तालुक्यतील सर्वच नदी-नाले ओसंडुन वाहत आहे.

भोकरदन तालुक्यातील ताडकळस येथील कृष्णा संजय जाधव वय वर्षे 19 हा तरुण आपल्या शेतामध्ये जात असतांना जुई नदीच्या पत्रामध्ये वाहुन गेला. गावातील नागरीकांनी शोध मोहिम राबवुन त्याला  शोधुन गाढले परंतु तो पर्यंत तो मृत झाला होता.

सदर घटना आमदार संतोष  दानवे यांना कळल्यानंतर त्यांनी मंगळवार दि.18 आॅगस्ट रोजी ताडकळस येथे मयत कृष्णा संजय जाधव यांच्या परिवाराची भेट घेवुन त्यांना धीर दिला व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजने अंतर्गंत 4 लक्ष रुपयांचा धनादेश मयताच्या आई-वडीलांकडे सुपुर्द करुन त्यांचे सांत्वन केले.

भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्यास आपण जाधव कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांनी सांगितले.

यावेळी तहसिलदार संतोष गोरड, तहसिलचे लिपीक दळवी, कृ.उ.बा.स.संचालक बालाजी औटी, सरपंच शंकर जाधव, मा.सरपंच अंकुश  जाधव, राजु पिसे, कृष्णा कुदर, भगवान जाधव यांच्यासह गावातील नागरीकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक