भोकरदन तालुका

संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन

अध्यक्षपदी सुर्यकांत जाधव तर सचिवपदी कांबळे

श्रीक्षेत्र राजूर प्रतिनिधी दि १९

राजूर येथे रोजी नाभिक सेवा संघाच्या वतीने नाभिक समाजभूषण संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . यावेळी मान्यवरांनी संतसेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकणारी भाषणे करून त्यांना अभिवादण केले .

तसेच राजूर येथील नाभिक सेवा संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून यामध्ये अध्यक्षपदी सुर्यकांत जाधव उपाध्यक्षपदी रवी लोणकर तर सचिवपदी लक्ष्मण कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच उर्वरित कार्यकारिणीत शंकर पंडित, छगन लोणकर, ज्ञानेश्वर बोर्डे,कान्ताराव बोर्डे , अर्जुन पंडित, बाळूभाऊ कानडे, गणेश मोहिते,संजय सुरडकर ,गजानन कानडे ,शंकर कानडे , संदीप बोर्डे, कैलास कानडे, दिगंबर मोहिते , कृष्णा जाधव, गणेश कांबळे आदींची निवड करण्यात आली असून .

नाभिक समाजाच्या अडी अडचणी व समस्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच येणाऱ्या काळात समाजातील विविध समस्यावर मार्ग काढून त्या सोडवण्याचे बैठकीत ठरले . नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून समाजबांधवाकडून स्वागत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक