घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात लालपरीच्या वाहक,चालकचा ग्रामस्थांनी केला सत्कार

जिल्ह्यात दणक्यात लालपरीचे स्वागत

कुंभार पिंपळगाव /संभाजी कांबळे दि २०

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव गावात लालपरी येताच चालक, वाहक,व प्रवाशाचे व बसचे स्वागत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.लॉकडाऊन मध्ये सर्व वाहतूक बंद असल्याने नागरिकांना अडचण निर्माण झाली होती. ती अडचण आता दूर झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

जिल्हातील वाहतूक परवानगी दिल्याने बसेस सुरु झाली आहे यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे नागरिकांनच्या चेहऱ्यावर आनंद होत असलेचे चित्र सध्या कुंभार पिंपळगाव परिसरात पहावयास मिळत आहे


बस येताच चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मा. मार्केट कमिटी सदस्य लालासाहेब शिंदे, किसनराव शिंदे, गोविंदराव शिंदे, राहुल पवार, शेख लतिफ भाई ,बंडू आडाणी,काशिनाथ पवार आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक