Breaking News
घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा-भाजप ची मागणी

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन तौर दि २० घनसावंगी तालुक्यात मागील चार ते पाच दिवसापासून सुरू असलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपा कडून करण्यात आली आहे यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे,भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलासराव शेळके,भास्करराव पांढरे,रामेश्वर गरड,योगेश ढोणे,सुरेश उगले,भाऊसाहेब देवडे,विलास चव्हाण,सिद्धेश्वर भानुसे,राहुल काळे,अमोल काळे,शिवाजी राठोड,संदीप काळे,जालंदर मुळे,मुकेश पवार, बाळु उगले सह भाजप कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. याबाबत पंचनामे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा घनसावंगी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक