देशविदेश

आमदार दानवे यांच्या कडुन अतिवृष्टी झालेल्या गावांचा पाहणी दौरा.

माहोरा : रामेश्वर शेळके

जाफ्राबाद तालुक्यात गेल्या १० ते १५ दिवसापासुन सतत मुसळधार पाऊस चालु असल्यामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना महापुर आला आहे.त्यातच तालुक्यातून वाहत असलेली धामणा नदीने काल आलेल्या महापुरा मुळे धामणा नदी पात्राने रौद्र रूप धारण केले होते.त्यामुळे नदी पात्राचे पाणी नदी काठी असलेल्या शेतांमध्ये शिरून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले मक्का,सोयाबीन,मिरची,कापूस,उडीद,मुग,आद्रक,ऊस,यासह इतर पिकांचे अतोनात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असुन या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे.

त्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी तालुक्यातील बोरगाव बु,बोरगाव (मठ),बोरी (खु),हिवरा (बळी),देऊळगाव (उगले),पिंपळखुटा,हारपळा,रेपाळा,मेरखेडा,विरखेडा (भा),निमखेडा (बु),देऊळझरी इत्यादी नुकसान ग्रस्त गावांच्या शेती शिवाराची पाहणी केली व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या आणि प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देऊन या गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक