बदनापूर तालुका

मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बदनापुरात कोरोना योध्दांचा सत्कार

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ दि २०

बदनापूर (दि. 20) : मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम
करणाऱ्या बदनापूर तालुक्यातील कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी वाळके म्हणाले की कर्तृत्वान व्यक्तींचे सत्कार करणे आणि प्रोत्साहन देणे आज गरज आहे.


आशा जागतिक महामारी बदनापुरात नव्हेत जालना जिल्ह्यात विविध कर्तबगारांचे सत्कार केला आहे.
तसेच कोव्हिडं 19 मध्ये बदनापूर येथे अनेक दिवसांपासून कोरोना परिस्थितीत जीवाचे पर्वा नकारता जनजीवन विस्कळीत न होता आरोग्य चांगले राहिले पाहिजे ही भूमिका प्रशासनाचे पदाधिकारी व पोलिस बांधव, पत्रकार ,यांच्या सह श्रीमती छाया पवार, तहसीलदार, बदनापूर, नायब तहसीलदार रामेश्वर दळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन उबाळे, पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील, सकाळ समुहाचे ता. प्रतिनिधी आनंद इंदानी, दै. मराठवाडा साथीचे ता. प्रतिनिधी किशोर सिरसाठ आदींना सन्मानपत्र व रोपटे भेट देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष गजानन वाळके, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष मनिषा पाटील, जि. पदाधिकारी सुवर्णा राऊत, योगेश मोरे, तुळशीराम मदन, गोपाल ठोंबरे,
अमोल चव्हाण, चंद्रकांत गोल्डे, बालाजी मदन, नारायण गोल्डे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक