परतूर तालुका

परतूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्याचे निवेदन

दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क दि २०
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती परतूरच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी परतूर मार्फत काही मागण्या करण्यात आल्या आहेत त्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, विचारवंत कुलगुरू डॉ. एम एम कुलबुर्गी, आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या तपासासाठी विशेष पथक गठीत करावी यासह विविध मागण्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती परतूर च्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यात


1). सर्व चार खून एकमेकात गुंतलेले असल्यामुळे केंद्रीय आणि राज्य सरकारच्या यंत्रणांचा सुसंवाद होणे आवश्यक आहे. आणि यासाठी चारी खूनांचा तपास व्यवस्थित होण्यासाठी एका विशेष तपास टीम गठीत करावी. 2) खूनात सहभागी असलेल्या संघटना आणि सूत्रधारांना अटक व्हावी आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी. 3)चारही केसेस मध्ये सरकारने चांगल्या वकिलांची नियुक्ती करावी. 4) धार्मिक मुलतत्ववादी लोक आणि संघटनांवर बंदी आणावी. 5) सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी एक कडक कायदा करावा.

आशा मागण्याचे निवेदन रोजी उपविभागीय अधिकारी परतूर मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले आहेत दिलेल्या निवेदनावर परतुर तालुका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे परतुर तालुका अध्यक्ष कल्याण बागल, कार्याध्यक्ष एकनाथ कदम, मारोती खंदारे, संभाजी तांगडे, नागोराव जाधव, सिद्धार्थ पानवाले, व आधी अंधश्रद्धा निर्मूलन परतुर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक