जालना जिल्हा

कॅनरा बँकेच्या पिककर्जबाबत जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना घेराव


संतप्त शेतकऱ्यांचा अग्रणी बँक व्यवस्थापकांना घेराव..!


जालना न्यूज ब्युरो दि २०: खरीप हंगाम संपत आला तरी कॅनरा बँकेच्या कृषी अधिकाऱ्या कडून होत असलेल्या अडवणूकीमुळे शेतकऱ्यांना अद्याप पिक कर्ज मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरूवारी ( ता. २०) जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना घेराव घालून जाब विचारला.


जालना तालुक्यातील गवळी पोखरी ,वखारी,वडगांव ,माळेगाव, ही गावे कॅनरा बँकेस दत्तक देण्यात आली आहे. कर्ज मुक्ती नंतर येथील शेतकऱ्यांनी नवीन पिक कर्जासाठी सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल करून दोन महिन्यांपुर्वी बोजा ही टाकला होता.तथापि बँकेतील कृषी अधिकाऱी विजय बोर्डे हे गैरहजर राहत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


दरम्यान काही शेतकऱ्यांनी मागील दिड ते दोन वर्षांपूर्वी सातबारा वर बोजा टाकून गहाण खत केले. निवेदने,उपोषण करूनही बँकेने त्यांना अद्याप ही कर्ज दिले नाही. असे प्रल्हाद कायदे यांनी सांगितले.


काही शेतकऱ्यांचा मंजूर झालेल्या पिक कर्जाची रक्कम येऊनही खाते जाणीवपूर्वक होल्ड केले गेले. असा आरोप शेतकरी प्रल्हाद म्हस्के यांनी केला. संतप्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत (लिड) अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी कॅनरा बँकेच्या कृषी अधिकाऱ्यास बोलावून प्रकरण मार्गी लावण्यात येतील असे वचन दिल्यानंतर शेतकरी परतले. या वेळी प्रल्हाद कायंदे, रवी जाधव, प्रल्हाद म्हस्के, सलीम परसूवाले, लता पवार,रोहिदास पवार, विनायक पवार, फकीरा राठोड, विनायक राठोड, दीपा पवार, हनीप परसूवाले, अनिल पवार, राम पवार, पंडित पवार, रमेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, छगन चव्हाण, संजय पवार यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

नसता आम्ही सरळ करू : खोतकर

दोन महिन्यांपासून बँकेत खेटे मारूनही मंजूर झालेले पिक कर्ज मिळत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सकाळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे निवासस्थान गाठून आपल्या व्यथा मांडल्या. खोतकर यांनी ही तात्काळ लिड बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधून चोहोबाजूंनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषी अधिकारी अडवणूक करत असेल तर त्यास समज देऊन प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढण्या बाबतीत कळवावे नसता चिरीमिरी मागणारा संबंधित अधिकारी व दलाल यांना आमच्या पध्दतीने सरळ करू असा गर्भीत इशारा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक