जालना जिल्हा

जिल्ह्यात अत्यंत साधेपणाने व सामाजिक अंतराचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा – जिल्हाधिकारी

न्यूज जालना दि 20–  गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यात कमीत कमी मंडळांनी अत्यंत साधेपणाने व सामाजिक अंतराचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले.

     गणेशोत्सवाच्या व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, तसेच जिल्ह्यातील सर्व शांतता समिती सर्व पदाधिकारी  गणेश मंडळांचे प्रमुख   आदींची  उपस्थिती होती

       जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले जिल्ह्यामध्ये गणेश मंडळांनी कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी नगरपालिका प्रशासनाकडून परवानगी घेणे  आवश्यक आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत त्या ठिकाणी मंडळांना गणेशोत्सव परवानगी देण्यात येणार नाही. असेही यावेळी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक