घनसावंगी तालुका

तिर्थपुरीत मोबाईल शॉपीचे दुकान फोडले

१ लाख ३१ हजार पाचशे रुपयाचे अँड्रॉइड मोबाइल लंपास

न्यूज जालना ब्युरो दि २०

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील श्रीराम मोबाईल शॉपी येथे चोरी करुन चोरट्यांना १ लाख ३१ हजार पाचशे रुपयाचे अँड्रॉइड मोबाइल लंपास केले आहेत.

याविषयी अधिक असे की, तीर्थपुरी शहागड रोडवर कन्हैया कॉम्प्लेक्स येथील तळमजल्यामध्ये अक्षय खोजे रा. साडेगाव यांची तीर्थपुरी येथे श्री राम मोबाईल शॉपीचे दुकान आहे.

ता.१९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हॅन्ड ग्रॅन्डरच्या कटरच्या साह्याने सेटरचे तीनही कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश केला. व दुकानातील महागडे १४ स्मार्ट फोन एकूण किंमत (१ लाख १३ हजार पाचशे रुपये) लंपास केले आहे.

अक्षय खोजे या तरुण युवकाने महिनाभरापूर्वीच नवीन मोबाईल शॉपीचे दुकान टाकले होते. शहागड तीर्थपुरी हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून चोरट्यांनी मोठ्या हुशारीने शेटर तोडण्यासाठी हॅन्ड ग्रॅन्डरचा वापर करून चोरी केल्याने तीर्थपुरी येथील दुकानदारा मध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक