दिवाळी अंक २०२१
पैठण येथील पंप हाऊसचा विद्यूत पुरवठा खंडीत केल्याने,जालना शहरावर पाणी टंचाईचे सावट.
बबनराव वाघ, उपसंपादक
पैठण येथुन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचे विजबिल रखडल्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्याने जालना शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
जालना शहराला पैठण येथील धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे परंतु महावितरणने थकित वीज बिलामुळे पैठण येथील पंप हाऊसचा वीज पुरवठा खंडित केला आहे.जालना शहराला पाणी पुरवठा पुर्णत: पैठण येथील धरणातुन केला जातो परंतु विद्यूत पुरवठा खंडीत केल्यामुळे जालना शहराचा पाणी पुरवठा होणार नाही.शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
जानेवारीपर्यंतचे विज बिल भरले असून देखील कुठलीही पूर्व सूचना न देता महावितरण कंपनीने पंप हाऊसच वीज पुरवठा खंडित केला असल्याचे नगरपालिकेचे सभापती यांनी म्हटले आहे. आता ऐन उन्हाळ्यात जालना शहरावर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.