Breaking News
जालना जिल्हा

जालना शहराचा स्वच्छतेत देशात २२ वा तर राज्यात ६ वा क्रमांक

न्यूज जालना ब्युरो दि २० ऑगस्ट

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय मंत्रालयाने घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० परिक्षेत जालना शहराचा (नगर परिषद) देशात २२ वा तर राज्यात ६ वा क्रमांक आला आहे.या परिक्षेचे आज निकाल जाहीर झाले. यात जालना शहराने जोरदार गुण मिळवल्याने पालिका प्रशासनावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये जालना शहराचा देशपातळीवर २२वा क्रमांक व राज्यपातळीवर ६ वा क्रमांक आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये एकूण ६ हजार गुणांची स्पर्धा ठेवण्यात आली होती.यामध्ये शहरातील नागरिकांचा सहभाग, परीक्षकांची तपासणी, नगरपालिकेची कागदपत्रे, कचरामुक्त व हागणदारीमुक्त शहराची रँकिंग असे एकूण चार भाग होते. प्रत्येक भागास पंधराशे गुण होते.

यामध्ये जालना शहरातील नागरिकांनी योग्यप्रकारे फीडबॅक दिल्याने तसेच परीक्षकांच्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये जालना शहरातील सर्व घटक चांगल्या प्रकारचे असल्याने हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी दिली.शहरात एकूण सहा हजार गुणांपैकी ४५३५ गुण प्राप्त झाले आहे. वरील सर्व कार्यासाठी शहरातील नागरिकांचे योगदान लाभले असून आमदार कैलास गोरंट्याल, अध्यक्ष संगीता गोरंट्याल, स्वच्छता सभापती सोनाली चौधरी, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

यामध्ये स्वच्छता अभियंता संजय वाघमारे, स्वच्छता निरीक्षक पवार, खर्डेकर , लोंढे, गावंडे , कसबे , पाजगे,अरुण वानखेडे, लोखंडे, शंकर बिल्ली, समन्वयक तुपे, ऋषीकेश, संदीप वानखेडे सर्व स्वच्छता कर्मचारी यांनी कामे केली. जालना शहराचा २२वा क्रमांक आल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक