जालना जिल्हा

जिल्ह्यातील ह्या सहा तालुक्यात अडीच महिन्यातच पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

न्यूज जालना ब्युरो दि २०

जालना जिल्ह्यात पावसाने अडीच महिन्यातच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यातील आठपैकी सहा तालुक्यात पावसाने सरासरीचे शतक पार केले आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्प भरले असून नद्यांना पूर आले आहेत.जालना जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६१६ मि.मी.एवढे आहे. यंदा मात्र पावसाने अडीच महिन्यातच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जालना जिल्ह्यात १ जून ते १९ ऑगस्ट दरम्यान सरासरी ६८३.८० मि.मी.एवढा पाऊस झाला आहे.

जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद,अंबड या सहा तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. परतूर व मंठा तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरीची नव्वदी पार केली आहे.गतवर्षी जालना जिल्ह्यात१जून ते १९ ऑगस्ट दरम्यान सरासरी २७५.२२ मि.मी.एवढा पाऊस झाला होता.त्याची टक्केवारी ३९.९८एवढी होती.यंदा जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्प भरले असून नद्यांना पूर आले आहेत. टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, अंबड तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाला असून या तालुक्यातील पाणी टंचाईचे संकट दूर झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक