बदनापूर तालुका

बदनापुर येथे मनसेचे जालना-औरंगाबाद रस्त्यावर बेशरम लावून आंदोलन.

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ दि २१
बदनापूर : जालना औरंगाबाद महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. याबाबत जागतिक बँक प्रकल्प विभागाला मनसेकडून निवेदन देऊन सुध्दा थातुर मातुर माती टाकुन मोजकेच खड्डे बुजवले होते. परंतु दररोज खड्ड्यांमुळे अपघात होत आहे अनेकांनी लोकांचा जीव ह्या महामार्गावरील खड्ड्यामुळे गेलेले आहे.

यावेळी गजानन गिते जिल्हाध्यक्ष , जालना ,विष्णु शिंदे तलुकाध्यक्ष बदनापुर,संजय ज-हाड शहरअध्यक्ष ,तालुकाउपाध्यक्ष बदनापुर कैलास खेण्डके ,तालुका उपाध्यक्ष बदनापुर गणेश शिंदे तालुका उपाध्यक्ष बदनापुर ,तालुका उपाध्यक्ष बदनापुर शिवाजी पवार ,रवि मदन तालुका उपाध्यक्ष बदनापुर,अनिकेत जारे, शिवाजी गिते, केदारनाथ ढाकने ,विनोद खेण्डके,उपस्थित होते


महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना च्या वतीने यापूर्वी निवेदन देण्यात आले होते . जालना – औरंगाबाद या रस्तावर प्रवास करत असतांना जालना ते बदनापुर पर्यंत व बदनापुर ते शहरात महामार्गावर असंख्य खड्डे पडले असुन या महामार्गावरुन जातांना शहरात पडलेल्या खड्डयामुळे अंदाज न आल्याने खड्डयामध्ये पडुन जखमी झालेले आहे .

आजच्या परिस्थितीत जालन्यापासुन बदनापुर ते औरंगाबादच्या सीमेपर्यंत प्रचंड खोलवर खड्डे पडले असुन वाहन चालक व दुचाकी स्वार प्रचंड जखमी तर होतच आहे पण काहीजणांनी आपला जिवही गमवला आहे . आणखी बदनापुर शहरातुन जात असलेल्या ड्रेनेज लाईनची आतापर्यंत सुध्दा साफसफाई केली नसुन रोडवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे . रोडवरील लावलेली झाडे पण आहे की नाही हे समजत नाही व नावापुर्तीच माती टाकुन कॉन्ट्रॅक्टर यानी थातुर मातुर कामे केली . यासर्व गोष्टीवर खर्चाला सिमा नसतानाही यासर्व गोष्टीचा विचार करता मा.मुख्यमंत्री जागतिक बँक प्रकल्प विभाग , औरंगाबाद संभाजीनगर व या रोडवर काम करणाऱ्या एजन्सी वर गुन्हे दाखल करण्यात यावे व खड्यांचे पंचनामे करुन तात्काळ या भ्रष्ट अधिकाऱ्यावर गुन्हे नोद करा अशी मागणी मनसेने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक