बदनापूर तालुका

बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या

संघर्ष फाउंडेशनचे तहसीलदार यांना निवेदन सादर..!

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ

बदनापूर ता. 20 : यंदाच्या ऋतु मध्ये जून जुलै ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाच रोषणगाव मंडळातील सर्व शिवारात सरासरीपेक्षा ढगफुटी झाली असून सहा वेळेस अतिवृष्टी होऊन शेतीतील जमिनी मधील सर्व पिक,व माती वाहून गेली असल्यामुळे येथील शेतकरी वर्गाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यावर्षी भरून निघू शकत नसल्यामुळे शासनाला वेळोवेळी निवेदन सादर करून सुद्धा अतिवृष्टीची पाहणी व पंचनामे करून दोन महिने होऊन गेले तरी देखील शासनाने व प्रशासनाने योग्य ते मदतीसाठी पाऊल उचलले नसून शेतकरी यांना सदर पिकाची आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांसाठी दहा दिवसात मदत आणि आश्वासन द्यावे अन्यथा संघर्ष फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोल छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी बदनापूर तहसीलदार छायाताई पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघर्ष फाउंडेशनचे सदस्य ऍड प्रशांत आरसुड,विनोद आरसुड सर, प्रदिप उगळमुले,भरत शेळके,आनंद इंदानी,डॉ मारुती चंदशीव,राहुल जऱ्हाड,किशोर सिरसाठ,श्री.गणेश जगताप,गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, नितीन सातपुते,. ऋषीकेश थोरात, डॉ.नितीन जऱ्हाड,अर्जुन वेताळ, इत्यादीची उपस्थिती होती..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक