जालना तालुका

सिंधीकाळेगाव भागात संततधार पावासामुळे कपाशी पिक धोक्यात

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी)

जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील दहा पंधरा दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन, शिड या पिकामध्ये पाणी साचल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकर्यामधु, केली जात आहे.त्यामुळे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी. शेतात पाणी जास्त झाल्याने शेतकर्यांच्या जमिनी चिबडल्या आहे


या जमिनीत मशागत करणे सुध्दा अवघड झाले आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून संततधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पिके नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


जून महिन्यापासून ज्याप्रमाणे पाऊस पडत होता त्यानुसार शेतकरी वर्गास चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती,परंतु गेल्या आवडाभरापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे कपाशी पिकांसह अन्य पिके नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील भागवत गिराम याच्यां शेतामध्ये कपाशी पिकामध्ये पाणी साचले आहे.

गेल्या दहा पंधरा दिवसापासुन पाऊस रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे माझे कपाशीचे पीक पुर्ण चिबडले आहे. कसबस उसनवारी करून औषध फवारणी खत टाकुन केलेला खर्च पाण्यात गेला आहे. शासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

भागवत गिराम सिंधीकाळेगाव शेतकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक