जालना जिल्हा

पाच महिन्यांनंतर जालन्यातील लाल परी रस्त्यावर

न्यूज जालना ब्युरो दि २१

कोवीड या महामारीच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपासून बंद असलेली राज्य परिवहन महामंडळाची आंतर जिल्हा बस सेवा गुरुवारपासून सुरू झाली आहे.जालना आगारातून सुरक्षितता ठेवत दोन प्रवासी बस जिल्ह्याबाहेर रवाना झाल्या.

कोवीड या महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा पाच महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती.दोन महिन्यांपासून जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु करण्यात आली होती,मात्र तिला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही.राज्य शासनाने गुरूवार दिनांक २०ऑगस्ट पासून राज्य परिवहन महामंडळाची आंतर जिल्हा प्रवासी बस सेवा सुरु करण्याचे आदेश काढले. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाची आंतर जिल्हा प्रवासी बस सेवा गुरुवारपासून सुरू झाली.

जालना आगारातून वाहक-चालक यांच्यासह प्रवासी मंडळींची सुरक्षितता ठेवत औरंगाबाद आणि पैठणसाठी दोन बसेस प्रवाशांना घेऊन सकाळी रवाना झाल्या ‌.जालना आगार व्यवस्थापक चव्हाण यांनी या दोन्ही बसेस निर्जंतुकीकरण करून बस चालक व वाहक मंडळींना मास्कचे वाटप केले.बसमध्ये भौतिक अंतर राखण्यात यावे,अशा सूचनाही चव्हाण यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक