बदनापूर तालुका

माजी आ. संतोष सांबरे यांच्या हस्ते बदनापूर तालुक्यातील सोमठाणा व राजेवाडी तलावाचे जलपूजन..!

बदनापूर / किशोर सिरसाठ दि २१

बदनापूर तालुक्यात यंदा पावसाने चांगली कृपा केली असून तालुक्यातील महत्तवाचा समजाला जाणारा सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प संपूर्ण क्षमतेने भरला असून दुसरा मोठा राजेवाडी येथील प्रकल्पही दुथडी भरून वाहत असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने दोन्ही ठिकाणी माजी आ. संतोष सांबरे यांच्याहस्ते जलपुजन करण्यात आले.


बदनापूर तालुक्यात यंदा निसर्गाची चांगलीच कृपा आहे यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली त्यामुळे शेतकरी सुखावला चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात १३ फूट पाणी आले असून मागील पाच वर्षानंतर या धरणात एवढा जलसाठा जमा झाला आहे.

शुक्रवारी बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी थेट या धरणावर व राजेवाडी येथील धरणावर जाऊन जलपूजन केले व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्प १९६५ मध्ये ८१ लाख रुपये खर्च करून झाले असून या प्रकल्पाचे उदघाटन तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. रफिक झकेरिया यांच्या हस्ते झालेले आहे या धरणाचे पाणलोट क्षेत्र २४८ चौरस कि.मी. आहे १९६२ मध्ये धरणाच्या बांधकामास सुरवात होऊन सदर काम तीन वर्षात पूर्ण झाले होते.

धरणाची उंची १७.६८ फूट आहे ते एकूण पाणी साठा १५.३९ द.ल.घन मीटर आहे तर पाणलोट क्षेत्र २४८ चौरस किलो मीटर आहे. तालुक्याचा वार्षिक सरासरी पाऊस ६५१ मिली मीटर असून १३ द.ल.घ.मी व १५.३९ द.ल.घ.मी. आहे तर लांबी ८ किलो मीटर आहे या धरणाखाली समादेश क्षेत्र ५ हजार ७०८ हेक्तर तर लागवडी ५ हजार २८३ हेक्टर असून सिंचन योग्य क्षेत्र ३ हजार ४०१ हेक्टर आहे त्यामुळे सोमठाणा धरणाचा फायदा शेतकऱ्यांना यंदा होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून यंदा रब्बीच्या पिकांना कालव्याद्वारे पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे कोरडवाहू शेतकरीही सुखावला आहे.

पाच वर्षानंतर धरणात मोठ्या प्रमाणात उपयुक्त जलसाठा झाला असून मागील सहा वर्षांपासून हे धरण तुडूंब भरले असून मागील पाच वर्षानंतर पहिल्यांदा या धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.त्याचप्रमाणे तालुक्यातील दुसरा मोठा असलेला राजेवाडी येथील प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला असून हा प्रकल्प उभारणीनंतर पहिल्यांदाच भरला आहे. राजेवाडी येथील प्रकल्प बनवण्यासाठी माजी आ. संतोष सांबरे यांनीही पाठपुरावा केलेला होता. आज दोन्ही धरणाची पाहणी करून या ठिकाणी विधीवर जलपुजन माजी आ. संतोष सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जलपूजन करून कायम तालुक्यावर पावसाचा वरदहस्त रहावा अशी प्रार्थना केली.

यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य भानुदास नाना घुगे, कैलास राव चव्हाण , शिवसेना जिल्हाप्रमुख भगवानराव कदम तालुकाप्रमुख जय प्रकाश चव्हाण ,युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, गटविकास अधिकारी हारकळ, देवजी नाना जर्हाड, गणेश डोळस, उपसभापती रवी बोचरे, भरत मदन, श्रीराम कान्हेरे, भरत सांबरे, नंदु दाभाडे,महादु गिते, राजु जर्हाड, अंबादास कोळसकर, संतोष नागवे,किशोर मदन, संभाजी मदन, प्रताप घुसिंगे, राजु घुसिंगे, रामचंद्र घुसिंगे, रामचंद्र सुदर्डे,भागचंद घुसिंगे, संजय घुसिंगे, विजयसिंग घुसिंगे,सिताराम घुसिंगे, कचरूसिंग घुसिंगे, गोडसिंग घुसिंगे, पन्नुसिंग घुसिंगे, कैलास घुसिंगे, रूपसिंग घुसिंगे, कचरू मगन सुदर्डे,संभाजी घुसिंगे, रामु दराडे, बाळु दराडे,संतोष मुळक, विलास तुपे,सखाराम जावळे,अर्जुन चव्हाण, कृष्णा कडोस, गजेंद्र लहाने,संजय कोल्हे, शेषराव गायके, मानिकराव गायके, डिगांबर नागवे,बंडु नागवे, दिलीप मेंढरे,कैलास गायकवाड,प्रकाश तायडे, ज्ञानेश्वर मखरे, अशोक नागवे, राधाकृष्ण जोशी, भिमराव मैंद, बाळु पवार, रमेश पवार, अनिकेत नागवे, अतुल नागवे,बंडु नागवे, रामु नागवे याच्यासह पदाधिकारी शिवसैनिक यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक