बदनापूर तालुका

निराधारांनासाठीचा तो जाचक निर्णय तात्काळ रद्द करावा

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ ता.21:

बदनापूर येथील निराधारांनावर नवीन शासनाच्या नियमानुसार लाभार्थ्यांना अनुदानासाठी 21 हजाराचे उत्पन्न सक्तीचे करण्यात आलेले आहे ते उत्पन्न प्रमाणपत्र मिळणे जिकिरीचे झाले आहे संबंधित लाभार्थीच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता आहे त्यामुळे हा शासन निर्णय जाचक असून हा नियम तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

निराधारांच्या २१००० उत्पन्नाबाबत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळण्याबाबत दहा दिवसांमध्ये निर्णय घ्यावा नसता भाजपा युवा मोर्चा च्या माध्यमातून उपोषण करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे निवेदनावर गणेश कोल्हे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नंदकिशोर शेळके भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रावसाहेब बिडे संजय कोल्हे सत्तार बेग सुधीर पवार विनोद मगरे सावळाहरी शेळके गणेश दाभाडे समशेर बेग रामेश्वर काकडे शरद आवघड आदींच्या स्वाक्षरी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक