परतूर तालुका

भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी राहुल लोणीकर यांची नियुक्ती

दीपक हिवाळे / परतुर न्यूज नेटवर्क दि २१
भाजपा युवा मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी ही कार्यकारिणी घोषित केली. जालना जिल्ह्यातील भाजपाचे तरुण नेतृत्व, जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य राहुल बबनराव लोणीकर यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस पदी तीन जणांची निवड करण्यात आली असून मराठवाड्यातून एकमेव राहुल लोणीकरांना संधी देण्यात आली आहे. विदर्भातून नागपूरच्या शिवानी दानी वखरे यांना तर पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याच्या सुशील मेंगडे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्ष संघटनेत अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सरचिटणीस पदावर राहुल लोणीकरांची वर्णी लागल्याने मराठवाड्यातील पक्ष संघटनावर लोणीकरांची पकड अधिक घट्ट होण्यास मदत होईल असे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे. मुख्यमंत्री चषक स्पर्धेत खेळाडूंची सर्वाधिक नोंदणी, सर्वाधिक सामन्याचे आयोजन, मराठवाडा स्तरावर रक्तदान शिबिरांचे आयोजन आदी पक्षाचे ठरवून दिलेल्या उपक्रमांमध्ये राहुल लोणीकरांनी सहभाग नोंदवून ते यशस्वी करून दाखविल्याचे बक्षिस म्हणून हे महत्वाचे पद त्यांना देण्यात आल्याचे बोलले जाते.

राहुल लोणीकरांच्या नियुक्तीबद्दल परतूर मतदार संघासह संपूर्ण जालना जिल्हात तसेच मराठवाड्यात ठीकठिकाणी फटाके फोडून भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

तिर्थपुरीत जल्लोष – भाजप चे राहुल भैय्या लोणीकर यांची भाजपा युवा मोर्चा च्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल तिर्थपुरी येथे फटाके फोडुन आनंद उत्सव साजरा करतांना अंकुशराव बोबडे रोजगार हमी तालुका अध्यक्ष , दत्ता पाटील चिमणे, विठ्ठल बोबडे, भाऊसाहेब देवडे,‌ रामेश्वर गरड, सिद्धेश्वर भानुसे, नितीन भुतेकर, राहुल काळे, किशोर गिराम, विकास मुकणे, नितीन शिंदे, योगेश ढोणे, लहू मुळक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माजी मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार प्रदेश सरचिटणीस विजयराव पुराणिक आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील युवा मोर्चा प्रदेश प्रभारी संजय कोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करत आलो आहे, करत राहणार आहे. वरिष्ठांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी आणि पक्षाचे काम निष्ठापूर्वक करील. पक्षाने माझ्या खांद्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल

राहुल लोणीकर
नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस
भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य
वाटूर

वाटुरमध्ये फटाके वाजवून जल्लोष

वाटूर ता.परतूर चौकामध्ये
मा राहुलभैय्या लोणीकर यांची युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस (महामंत्री पदी) निवड झाल्या बद्दल वाटुर येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला
या वेळी राजु वायाळ माधव भैय्या जनकवार संभाजी वारे, जगदिश भैय्या पडुळकर आप्पासाहेब सावंत लहु आढे प्रकाश वाघमारे प्रकार मुळे रामजी शिंदे देवनाथ शिंदे प्रकाश वायळ शुभम आढे ईश्माईल शेख भगवान पाटोळे हकिम शेख अजय तराशे यांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक