Breaking News
औरंगाबाद जिल्हा

औरंगाबाद बीड बायपास रस्त्यावरील कोंडी दूर करुन रस्त्याची देखभाल करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश

इमरान पठाण /औरंगाबाद, दि.21 :- वाहतुकीमुळे कोंडी होत असलेल्या बीड बायपास रस्त्यावरील कोंडी दूर करुन या रस्त्याची योग्य देखभाल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणांना दिले.

पालकमंत्र्यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष बीड बायपासवरील मिन्हाज हॉटेल येथे भेट देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. सदरील सूचना प्राप्त होताच या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ सुरू देखील केली आहेत.


पैठण रोड येथील कृषी विज्ञान केंद्रापासून झाल्टा फाट्यापर्यंत रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. बीड बायपास रस्त्यावर पटेल लॉन्स, हिवाळे लॉन्स, देवळाई चौक, शिदोरी हॉटेल एम आय टी महाविद्यालय समोरील रस्ता आदी परिसरातील रस्त्याच्या एकतर्फी भाग पावसामुळे मोठ्याप्रमाणात खराब झाला आहे. सदर रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी उजव्या व डाव्या बाजूला पाणी साचून आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे सपाटीकरण करून व्यवस्थित उतार देणे तसेच या रस्त्यावर मध्यभागी व बाजूला मोठ्याप्रमाणात खड्डे पडलेले आहेत व रस्ता खचलेला आहे. याबाबत तत्काळ योग्य प्रतीची साधनसामुग्री वापरून दुरूस्ती करावी. रस्त्यावरील पाणी साचून डबके तयार झालेले आहे, या पाण्याचा निचरा करण्यात यावा, अशा सूचना चव्हाण यांनी संबधित अधिकाऱ्यांना केल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक