औरंगाबादघनसावंगी तालुकाजालना जिल्हा

घनसावंगी तालुक्यातील जमिनीचे अधिग्रहण न करताच रुंदीकरणाच्या कामाला कोर्टाची स्थगिती

  घनसावंगी /प्रतिनिधी  अंबड- घनसावंगी-कुंभार पिंपळगाव या राज्यमहामार्ग तील जमिनीचे अधिग्रहण न करताच सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिका क्र. ५६८०/२० यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, जिल्ह्यातील अंबड-घनसावंगी- पाडळी-कुंभार पिंपळगाव-आष्टी  या राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम शासनाद्वारे मंजूर करण्यात आले असून गुजरात येथील कलाथिया इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी च्या माध्यमातून रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे परंतु या रस्त्यालगतच्या कोणत्याही शेतकऱ्यांना कायदेशीर नोटीस न देता तसेच रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे कोणतेही कायदेशीर अधिग्रहण न करता व त्यांचा मोबदला न देता काम सुरू करण्यात आले आहे वास्तविक पाहता महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार शासनाने आधीच जमीन अधिग्रहण करूनच काम केले पाहिजे परंतु तसे करण्यात आलेले नाही याबाबत संबंधित शेतकऱ्यांना कंपनीचे कर्मचारी महसूल व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले की सदरील रस्ता पूर्वीचाच असून त्याचा मोबदलाही यापूर्वीच देण्यात आलेला आहे परंतु सदरील राज्य महामार्गाच्या प्रस्तावित रुंदीकरणासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले नाही रुंदीकरणाच्या कामात रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या 12 मीटर पेक्षा जास्त जमिनीचा मोबदला न देता 24 मीटर ते 30 मीटर पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिग्रहित केलेली आहे, संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न देताच शासनाद्वारे खासगी कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीवर करण्यात येणाऱ्या बेकायदेशीर कामामुळे व्यथित होऊन घनसावंगी,म.चिंचोली, पाडळी,कुंभार पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी अॅड.स्वप्नील ए. देशमुख व अॅड.निखिल आर. जैन यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर काही दिवसापूर्वी रिट याचिका दाखल केली होती सदरील रिट याचिका मा.उच्च न्यायालय यांनी स्थगिती दिलेली आहे.       सदरील रस्ता हा 12 मिटर चा असून तो 24 ते 30 मीटर पर्यंत बाधित होत असून बांधकाम विभाग यांना या याचिकेत आपले म्हणणे दाखल करण्यास अवधी दिलेला आहे,या पुढील सुनावणी एक आठवड्यानंतर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक