अंबड तालुका

अंबड बस स्थानकातून आंतरजिल्हा बस सेवेला प्रारंभ

  अनिल भालेकर /अंबड दि २२ कोरोना महामारी मुळे गेल्या पाच महिन्यापासून बंद करण्यात आलेली आंतरजिल्हा बस सेवेला प्रशासनाने हिरवा कंदील दाखवतात अंबड आगाराने ही त्या दृष्टीने नियोजन केले आहे. अंबड आगार हे एसटी महामंडळाला प्रवासी भारमान देण्याबाबत मराठवाड्यात अग्रेसर असते. या आगाराच्या दूर अंतराच्या बस सेवेमुळे एसटी महामंडळात भरघोस उत्पन्न मिळत होते. परंतु कोरोना संकटामुळे गेली पाच महिन्यापासून बाहेर जिल्ह्यात जाणाऱ्या बस या आगारातच उभ्या होत्या. ठराविक जिल्हा अंतर्गत मार्गावर मात्र काही बसेस धावत होत्या.मात्र अंबड आगारातून पुणे,औरंगाबाद, बीड,धुळे,अकोला,या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावरील बसेस मात्र गेल्या पाच महिन्यांपासून बंद होते. प्रशासनाने जिल्ह्याबाहेर बस जाण्यास परवानगी देतात अंबड धुळे ही पहिली जिल्ह्याबाहेर जाणारी बस आज 21 ऑगस्ट रोजी रवाना झाली. तर 22 ऑगस्ट पासून पुणे मार्गावर 3, औरंगाबाद मार्गावर 4,परभणी मार्गावर 1, याप्रमाणे प्रवाशांच्या सेवेसाठी नियोजन केले माहिती आगार प्रमुख यांनी दिली. प्रवाशांनी सर्व नियमाचे पालन करून एस टी महामंडळ प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना संकटामुळे नेहमी गजबजलेले असणारे बस स्थानक गेल्या पाच महिन्यापासून ओसाड पडले होते. परंतु आंतरजिल्हा बस सेवा सुरू होताच बस स्थानकावर प्रवाशांची वर्दळ पाहावयास मिळाली. पैठण जालना, जालना बीड, परतूर पैठण, परळी भुसावळ,जालना कलबुर्गी,बीड लातूर,या दुसऱ्या आगाराच्या जिल्हा बाहेर जाणाऱ्या बसेस ही या बस स्थानकातून मार्गस्थ झाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक