जालना जिल्हा

कोरोना संदर्भात अनावश्यक चाचण्या न करण्याचे राज्य शासनाचे निर्देश

बबनराव वाघ, उपसंपादक

जालना/प्रतिनीधी : राज्यात सर्वच जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात चाचण्या घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने शासनाचा खर्च वाढला असून अनावश्यक चाचण्या टाळून केवळ कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचीच चाचणी घेण्यात यावी असे स्पष्ट आदेश राज्य शासनाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

या आदेशात प्रधान सचिवांनी म्हंटले आहे की, राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. कोविड=19 चाचण्यांसाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड चाचण्या करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटा साठीचा प्रकार त्याअंतर्गत नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरीत चाचणी करणे आवश्यक आहे. अशाच व्यक्तींची अँटीजन चाचणी करण्यात यावी.जेणेकरून अशा रुग्णांच्या उपचाराबाबत तात्काळ निर्णय घेता येणे शक्य होईल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.RTPCR चाचणी ही अँटीजन चाचणी नकारात्मक आलेले व लक्षणे असणारे रुग्ण,पॉझिटिव्ह व्यक्तीच्या फार जवळून संपर्कात आलेले आणि परदेशातून येणाऱ्या व्यक्तींचीच करावी असे स्पष्ट निर्देश या आदेशात प्रधान सचिवांनी दिले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात एकाच व्यक्तीच्या दोन ते तीन चाचण्या करण्यात येतात त्यामुळे चाचण्यांवरील ताण वाढत असतांनाच दुसरीकडे शासनाचा आर्थिक भार देखील वाढत असल्याची चिंता अप्रत्यक्ष व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक व्यक्तीची चाचणी प्रोटोकॉल नुसार करावी अधिकच्या चाचण्या करू नये सूचना देऊन प्रवास करणाऱ्या व्यक्ती,जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्ती,व्यापारी इत्यादी व्यक्तींना कोविड सदृश्य लक्षण नसल्यास चाचणी करण्यात येऊ नये,असेही प्रधान सचिव श्री व्यास यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रधान सचिवांच्या या आदेशामुळे आता अनावश्यक चाचण्यां घेण्यावर चाप लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक