Breaking News
जालना तालुका

रामनगर परीसरात जिओ नेटवर्क ची सेवा कोलमडली

बबनराव वाघ, उपसंपादक

जालना तालुक्यातील रामनगर सर्कलला मागील चार पाच महीण्यांपासुन जिओ मोबाईलची सेवा कोलमंडली असुन ग्राहकातुन नाराजी व्यक्त केली जात अाहे,या सेवेला ग्राहक वैतागले असल्याचे चिञ रामनगर सर्कलमध्ये बघायला मिळत आहे,यापुर्वी जिओ ची सुविधा चांगल्या प्रकारे मिळायची ग्राहक संतुष्ट असायचे पंरतु चार पाच महीण्यांपासुन विस्कळीत झालेल्या सेवेला ग्राहक वैतागले आहेत. जिओ मोबाईल धारक ईतर नेटवर्क मध्ये सुविधा घेण्याच्या विचारात असल्याचे समोर येत आहे.

जिओ मोबाईल डाटा स्पिड व फास्ट नेटवर्क व कॉलींगसाठी खुपच गाजले होते परंतु सध्याची परीस्थीती जिओ मात्र डेटा चालतच नाही असे झाले आहे. रामनगर भागातील ग्राहक आपली प्राथमीक पसंती जिओ लाच देत आहेत.तर कंपनीने याकडे लवकर लक्ष घालावे अन्यथा ग्राहक गमावुन बसावे लागेल असे ग्राहक बोलले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक