परतूर तालुका

परतुरात एकाचदिवशी 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

दीपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क
परतूर तालुक्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. कोरोनाची साखळी खंडीत करण्यास कुठेतरी यंत्रणा कमी पडलेली दिसत आहे.

शनिवारी दिवसभरात पुन्हा 11 कोरोणा रुग्णांची भर पडली असून एकूण 172 कोरांना रुग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी रुग्णालयातून उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण संख्या 116 मृत्यू 05 जणांचा झालेला आहे. व शनिवारी रोजी 51 रुग्णावर उपचार सुरू असून शनिवारी दिवसभरात आलेल्या प्रयोग शाळेतील अहवालानुसार सरस्वती कॉलनी परतुर येथील 2 वर्षीय मुलगी, 27 वर्षेय पुरुष, जय भवानी कॉलनी परतूर – 50 वर्षीय पुरुष, आष्टी येथील 15 वर्षीय पुरुष, चिंचोली 65 वर्षीय महिला, 23 वर्षीय महिला, 25 वर्षे पुरुष असे सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले असून शनिवारी शहरातील रामेश्वर गल्ली तसेच नारायणदादा चौक परिसरातील ११३ जणांची अँटीजन चाचणी घेण्यात आली.यामध्ये एकुण ४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.त्यांना आंबा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. परतुर येथे झालेल्या Rapid टेस्टमध्ये रामेश्वर गल्ली परतूर येथील 40 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष भाजी मंडी परतूर येथील 40 वर्षीय महिला, व नारायण दादा चौकातील 22 वर्षीय पुरुष, असे दिवसभरात एकत्रित 11 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. अशी माहिती परतुर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाहेद सय्यद यांनी न्यूज जालना प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक