Breaking News
जाफराबाद तालुका

जिजामाता विद्यालयातील गुणवंतांचा गौरव


टेंभुर्णी /सुनील जोशी
हनुमंतखेडा ता जाफ्राबाद येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संरक्षण सेवेतील नायक पदावर कार्यरत असलेले संतोष दगडूबा भोपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान भोपळे,सरपंच भक्ता चव्हाण, कैलास भोपळे , विठ्ठल शिंदे, परमेश्वर भोपळे, शाळेचे मुख्याध्यापक रामदास शेवत्रे, उपमुख्याध्यापक गणेश आमले यांची प्रमुख उपस्तिथी होती. स्व. बापूराव पाटील कळंबे सेवाभावी संस्था आणि स्मृती प्रतिष्ठान टेंभुर्णी यांच्यातर्फे शालांत प्रमाणपत्र परीक्षा शैक्षणिक वर्ष 2019-20 या सत्रात झालेल्या परीक्षांमध्ये प्रथम प्रिंयांका पठाडे, द्वितीय रूपाली रामदास भोपळे, तृतीय कु. जया पंजाबराव चव्हाण या या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे स्व. गयाबाई भगवान भोपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मातोश्री पुरस्काराने
प्रथम गुणवंत विद्यार्थिनी कुमारी प्रियंका सुरेश पठाडे हिचा गौरव करण्यात आला. लिंबाजी भोपळे, बबन खेडेकर, प्रकाश भोपळे, भगवान शिंगणे,जितेंद्र भोपळे,गुलाबराव भोपळे हस्ते,
पंचफुलाबाई भोपळे, प्रकाश भोपळे यांच्या हस्ते गुणवंताचा गौरव करण्यात आला.सुत्रसंचलन शैलेश वाघमारे यांनी केले, कार्यक्रमासाठी
श्री आमले, शैलेश वाघमारे, संतोष दुधळकर, शत्रूघ्न भोपळे, सुभाष राठोड, सरीता भागिले, सुशील शिंदे, कौतिक भोपळे, सुनिल शेवत्रे, श्रीमती शिंदे, संतोष भोपळे,रामदास शेवत्रे, गजानन चव्हाण, जावेद बरडे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक