नांदेड जिल्हा

मोहरम साध्या् पद्धतीने पाळण्याबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचना

बबनराव वाघ, उपसंपादक

न्युज नांदेड ब्युरो दि. 22 :- कोव्हीड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहेत. या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

मातम मिरवणकू : केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम / दुखवटा करु नये. वाझ / मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया/ आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही. ताजिया / आलम घरीच, घराशेजारी बसवून तेथेच शांत / विसर्जन करण्यात यावेत. सबील / छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये. या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. कोणत्याही कार्यक्रमात चार पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसल्याचे मार्गदर्शक सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड-19 च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान, प्लाज्मा, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छते विषयक जनजागृती करावी. याचबरोबर कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असेही गृह विभागाने दिलेल्या सुचनांमध्ये म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक