Breaking News
भोकरदन तालुका

झाडे लागवड करून जगवणे महत्वाचेसहाय्यक आयुक्त वैशाली रसाळ यांचे आवाहन

मधुकर सहाने : भोकरदन


मानवी जीवनासाठी पर्यावरण आवश्यक असते आणि पर्यावरण संतुलनासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. वृक्षाची जीवनाशी गरज असल्याने वृक्षलागवड उपक्रम महत्त्वाचा असून या माध्यमातून अधिकाधिक झाडे लावणे लावलेली झाडे जगवणे आणि त्यांची वाढ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आवाहन औरंगाबाद येथील विभागीय सहाय्यक आयुक्त वैशाली रसाळ यांनी भोकरदन येथील पंचायत समितीच्या समोर झाडे लागवड करतांनी केले

भोकरदन येथील गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्या संकल्पनेतून भोकरदन पंचायत समिती अंतर्गत झाडांची लागवड हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचा सुरुवात सहायक आयुक्त वैशाली रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला

दरम्यान भोकरदन येथील पंचायत समितीच्या तपासणी व अहवाल सादर करणे याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भोकरदन येथील गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत. गटशिक्षणाधिकारी श्री शहागड. कृषी अधिकारी. श्रीमती बोडखे. आरोग्य अधिकारी.विस्तार अधिकारी श्री पाखरे. श्री सोनवणे. सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक