जाफराबाद तालुका

महावितरण कंपनी खाजगीकणाच्या उंबरठ्यावर

टेंभुर्णी / सुनील जोशी : महावितरण कंपनीने बदली धोरण राबविताना सी व्ही (compalsary vacancy) ही पदे रिक्तच राहतील असे धोरण राबवून एक परिपत्रक निर्गमित केले व मुख्य अभियंता पासून सहायक लेखापाल ही पदे ज्या ठिकाणी रिक्त असतील त्या ठिकाणी ती पदे कायम रिक्त राहतील असे परिपत्रक निर्गमित केले. तसेच वर्ग तीन व चार ची compalsary vacancy बाबत मंडळ व विभागीय
कार्यालयाना तसे आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आले आहेत. ह्या आदेशाचे विभागीय कार्यालय जालना -१ येथे संध्याकाळी सदर परिपत्रकाची होळी करण्यात आली.

त्या प्रसंगी प्रत्येक संघटनेच्या पदाधिकार्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, आणि सदर परिपत्रकाची होळी केली, त्यावेळेस कृती समितीचे खालील पदाधिकारी उपस्थित होते.
एस इ ये संघटनेचे दुसंगे, कुलकर्णी, म रा वीज तांत्रिक कामगार संघटनेचे राधेश्याम शडमल्लु, जितेंद्र दाणे, जगन कुलवत, कैलास वैष्णव, शेख हमीद, वर्कर्स फेडरेशन संघटनेचे आयाज पठाण, अमर डांगे, संतोष मिसाळ, गणेश चिरखे, राठोड तसेच कामगार महासंघाचे योगेश जाधव, पंढरीनाथ सोळंके, मागासवर्गीय संघटनेचे चंदनमोरे, बहुजन अभियंता कर्मचारी फोरम चे प्रकाश चव्हाण, बाबू राठोड यांचे सह अभियंते, कामगार, कर्मचारी अभियंते बंधू भगिनी असंख्य संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक