घनसावंगी तालुका

मुद्रेगाव गावातील रस्ते झाले चिखलमय ,ग्रामपंचायत चे दुर्लक्ष

सुदर्शन राऊत/ मुद्रेगाव २३ ऑगस्ट

घनसावंगी तालुक्यातील बारसे लोकसंख्या असलेल्या मुद्रेगाव गाव अंतर्गत मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून सर्व रस्ते चिखलमय झाले आहे याकडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष आहे


सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ते, नाल्या तुडुंब भरल्या आहेत गावातील रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचलेले असते खड्डयात रस्ता कि रस्त्यात खड्डा हे ओळखणे कठीण होऊन बसले आहे

या रस्त्यावरून गावातील नागरिकांना चालणे कठीण होऊन बसले आहे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून साथीचे रोग व इतर रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही पावसाळ्यापूर्वी ग्रा पं प्रशासनाने रस्ता नालीबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही गावाचा विकास कोसो दूर आहे गावच्या विकास कामाकडे ग्रामसेवक यांचे लक्षच नाही अशी ओरड ग्रामस्थांतुन होत आहे


पावसाळ्यात होणारी रस्त्याची दुरावस्था पाहून गावातील अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डयात साचलेल्या सांडपाण्यात विविध प्रकारचे किटक तयार होतात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे वरिष्ठांने लक्ष देण्याची मागणी होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक