बदनापूर तालुका

राजेवाडी तलावाच्या साडव्याच्या पाण्याने दोन गावातील ५० हेक्टर शेतीचे नुकसान

शेतकऱ्यांची पिकांची पंचनामे करून नुकसान भरपाईची देण्याची तहसीलदारकडे मागणी..!

बदनापूर / किशोर सिरसाठ ता २३
बदनापूर तालुक्यातील राजेवाडी साठवण तलाव ओव्हरफलो झाल्याने सांडव्यातून मोठया प्रमाणात पाणी विसर्जित होत आहे. यामुळे केळीगव्हान गावातील 50 हेक्टरक्षेत्रात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान होत आहे

नुकसान झालेल्या पिकांची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची आर्थिक मदत द्यावी असे निवेदन शेतकऱ्यांनी बदनापूर तहसीलदार छाया पवार यांना ता. 21 शुक्रवारी देण्यात आले होते.


राजेवाडी तलावमध्ये अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ झाल्याने केळीगव्हान येथील यांच्या जमिनी भराडखेडा शिवारात शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी आहे. तलावाचे पाणी जमिनीत अतिरिक्त शिरल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली असून शेतकरी चिंतातुर झाले आहे.


ह्या भागात फळबाग क्षेत्र 10 हेक्टर च्या आसपास असून त्यात डाळिंब,मोसंबी,द्राक्ष तर खरीब हंगामातील पिके कापूस, तर, बाजरी, मका, सोयाबीन, इत्यादी 40 हेक्टर पिकासहित जमिन पाण्यात गेली आहे. हे संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे.

सदर्भित पिकांची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची आर्थिक मदत द्यावी असे निवेदन शेतकऱ्यांनी बदनापूर तहसीलदार छाया पवार यांना ता. 21 शुक्रवारी देण्यात आले होते. निवेदनावर विविध शेतकऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहे .यावेळी पद्माबाई राम चौधरी, सुधाकर सुभाष रुद्रे, मधुकर एकनाथ रुद्रे, शरद मधुकर रुद्रे, सुभद्राबाई मधुकर रुद्रे, कुमार एकनाथ रुद्रे, विश्वनाथ बाबुराव मदन, ज्योती राजेंद्र मदन, संपत त्र्यंबक चौधरी ,पांडुरंग भाऊसाहेब मदन ,किशोर संपतराव मदत, इत्यादि शेतकरी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक