Breaking News
घनसावंगी तालुका

विरेगव्हाण तांडा येथे अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था,ग्रा.पं.लक्ष देण्याची मागणी



जांब समर्थ, प्रतिनिधी कुलदीप पवार दि २४


घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा हे जवळपास दोन हजार लोकसंख्येचा गाव असून, परंतु गावातील रस्ते चिखलमय झाल्यामुळे गावात सर्वत्र घाणीचे वातावरणात निर्माण झाले आहे.या रस्त्यांना लहानमुलासह,अपंग, वयोवृद्ध नागरीकांना पायी चालणेही मुश्कील झाले आहे. याकडे मात्र ग्राम पंचायत चे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

काही नागरीकांच्या घरासमोर पाणी साचले आहेत.काही भागात मातीमिश्रीत मुरूम टाकल्याने रस्त्यात चिखल झाला आहे.नाली नसल्याने घरासमोर पाणी वाहत आहेत.गावातील‌ रस्ते चिखलमय झाले असून अंडरग्राऊंड नाल्यांची व रस्त्यांची कामे करण्यात यावी गावात रस्त्यांची कामे करण्यात यावी.गावातील‌ रस्त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.साथीचे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.गावातील नाल्यांची बांधणी व पाणी गावाबाहेर काढण्यात यावे.ग्रा.प.ने तात्काळ लक्ष देऊन दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधुन केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक