भोकरदन तालुका

पिंपळगाव रेणुकाईत एकाच कुटुंबातील दहा जणांची कोरोनावर मात

पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामस्थ व महिला मागील काही दिवसापुर्वी भोकरदन येथील कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत होते. ते कोरोनावर मात करुन घरी परत आलेल्या नागरिकांचा सत्कार व सन्मान पिंपळगाव रेणुकाई येथील  देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी सोमवारी करण्यात आला.यावेळी गुलाब पुष्प व पेढे भरुन त्यांचा आगळावेगळा सत्कार करण्यात आल्याने संबंधिताचे मन गहिवरुन आले होते.

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मागील पंधरा दिवसापुर्वी एकाच गल्लीतील एकाच कुटुंबातील दहा ते बारा जणांचे कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आले होते.यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने विशेष खबरदारी बाळगत कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गावात तिन दिवसाची संचारबंदी लागु करुन गावात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

सदर कोरोना बाधीत रुग्णांना भोकरदन येथील कोवीड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्या ठिकाणी सदर कुटुंबातील रुग्णांवर दहा दिवस उपचार करण्यात आले.उपचानतंर पुन्हा त्यांचे स्वँब घेऊन त्यांचा अहवाल प्रयोग शाळेत पाठविण्यात आला होता.माञ दुसरा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याने त्यांना चार ते पाच दिवसापुर्वी सुट्टी देण्यात आली होती.

यामुळे कोरोना सारख्या महामारी रोगावर विजय मिळवुन घरी परत आल्यानंतर त्यांच्या मनातील भिती दुर करण्यासाठी व त्यांच्याकडे समाजाने पाहण्याचा दुष्टीकोन बदलावा म्हणून येथील अमोल देशमुख,हरिभाऊ आहेर,अजय देशमुख. यांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन करुन सोमवारी त्यांच्या गुलाब पूष्प व पेढे भरुन सत्कार करुन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य जि.एच.राव. उत्तमराव जाधव,संजय गुप्ता,विठ्ठल देशमुख,मुन्ना गुप्ता.
मनोज देशमुख,गणेश सपकाळ .आदीची उपस्थिती होती.दरम्यान कोरोना हा रोग खोकला व सर्दी सारखा साधारण असुन या रोगाचा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात भिंती पसरविण्याचे काम होत आहे..त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता शासन आदेशाचे पालन करुन आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत कोरोनावर मात करुन घरी आलेले  यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक