Breaking News
अंबड तालुका

अंबड येथील विजवतरण कार्यालयात मनसेकडून तोडफोड

लॉकडॉउन काळातील वीजबिल बाबत मनसेकडून कार्यालयाची तोडफोड

अनिल भालेकर/अंबड दि २४

जालना जिल्ह्यातील अंबड येथील विजवतरण कार्यालयात सोमवारी दुपारी काही मनसे कार्यकर्तानी तोडफोड केली आहे.यात कार्यलयातील संगणक, टेबल, खुर्च्या सह कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन लागू करण्यात आले होते. या काळात सर्व प्रतिष्ठाने, दुकाने, व्यवसाय, कारखाने, तीन महिन्यासाठी संपूर्णतः बंद होते. याकाळात सर्वसामान्यांना आर्थिक उत्पन्न असल्यामुळे अत्यंत चणचण भासत आहे.


या साठी लॉक डाऊन काळातील वीजबिल माफ करण्याबाबत मनसे जिल्हा अध्यक्ष बळीराम खटके यांच्या पुढाकाराने अंबड येथील वीज वितरण कंपनीमध्ये याबाबत यापूर्वीच निवेदन दिले होते तरीही याबाबत कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले आणि मनसे कार्यकर्ता व कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून मनसे स्टाईल आंदोलन करून वीज वितरण च्या विरोधातील रोष व्यक्त केला

अंबड वीज कंपनी ने वीज ग्राहकांचे तीन महिन्यांचे बिल माफ करावे , उर्वरित बिलाची रक्कम सवलत देऊन टप्प्याटप्यांने वसूल करावी , वीज जोडणी खंडीत करुन नये अशी मागणी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे . याचे निवेदन महावितरणच्या अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले . मात्र अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी कार्यालयावर हल्लाबोल केला . मनसेचे बळीराम खटके , पंडित पाटील , कृष्णा गोरे यांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक