Breaking News
जालना जिल्हा

आरक्षण फाईलची पूर्तता करा अन्यथा राज्यभर आंदोलनाचा ईशारा

धोबी समाजाचे काळे निवेदन देत निषेध आंदोलन

जालना न्यूज ब्युरो दि २४- राज्यातील धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे म्हणून त्रुटी असलेल्या प्रस्तावाकडे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने नाहक दहा महिन्यांपासून दुर्लक्ष चालवले आहे.सामाजिक न्याय खात्यात प्रस्ताव धूळखात पडून आहे.हा अचूक प्रस्ताव महिनाभरात केंद्राला पाठवला न गेल्यास राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना व मंत्र्यांना दिसतील तिथे काळे फासण्याचा ईशारा समाजाचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी दिला.

धोबी समाजाला हक्काच्या आरक्षणापासून राज्याचा सामाजिक न्याय विभाग वंचित ठेवत असल्याने आज सोमवार (२४ ऑगस्ट रोजी) महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यभर काळ्या फिती व काळे मास्क लावून काळेच निवेदन देत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.

राज्यातील धोबी समाजाला गेल्या २५-३० वर्षांपासून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने हेतूत: चालवलेल्या टाळाटाळीचा व चुकीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.सामाजिक न्याय विभागाचे विशिष्ट अधिकारी धोबी समाजाचा आरक्षण प्रस्ताव केंद्राला मुद्दाम सदोष
व त्रुटीपूर्ण पाठवत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे काळे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे नमूद करत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निषेध निवेदनात महिनाभरात मागणीची दखल घ्या अन्यथा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काळे फासून आमच्या समाजावर झालेल्या अन्यायाचा उद्रेक जाहीर करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे व प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या आजच्या आंदोलनात संतोष शिंदे,सतीश मोरे,ज्ञानेश्वर उबाळे,एम.आर निकम,सुभाष खैरे,गोपाल कुंडलीकर, संदिपपान शिंदे,संदीप मोरे,मच्छिंद्र शिंदे,सिद्धेश्वर खैरे,नवनाथ उबाळे,अंबादास व्यवहारे,अशोक काळे यांच्यासह अन्य समाजबांधव सहभागी झाले होते.

समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी काळे निवेदन स्विकारले

राज्यातील धोबी समाजाच्या आरक्षण प्रस्तावात हेतूत: त्रुटी ठेवणाऱ्यासामाजिक न्याय विभागाचा निषेध म्हणून समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना काळे निवेदन देतांना संतोष शिंदे, एम.आर निकम सतीश मोरे,ज्ञानेश्वर उबाळे,संदीपपान शिंदे आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक