Breaking News
जालना जिल्हा

कोरोना रुग्ण संख्या घटली ,सोमवारी जालना जिल्ह्यात दहा जण पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि २४ – आज दि .२४ / ०८ / २०२० रोजी RT – PCR तपासणीव्दारे एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला नाही . तर अँटीजेन तपासणीद्वारे १० व्यक्तींचा अशा एकुण १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे   जालना जिल्ह्यात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वाढ होत असताना सोमवारी मात्र घट झाल्याची दिसले . प्रशासनाकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार आज दि .२४ रोजी १० रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . यामध्ये अॅन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या १० रूग्णांचाच समावेश आहे . सदरील १० रूग्णांसह जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या आता ४१४२ वर पोहोचली आहे . आतापर्यंत एकूण १२६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे . तसेच आतापर्यंत एकूण रूग्णांपैकी २८९७ रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . आजघडीला जिल्ह्यात १११९ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत . जिल्हाभरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्येत सोमवारी घट बघायला मिळाली आहे . ०६ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू– जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार आज दि . २४/०८/२०२० रोजी ०६ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण जालना शहरातील नुतन वसाहत परिसरातील ५५ वर्षीय महिला , देवगाव तांडा येथील ४० वर्षीय पुरुष , पांगरी गोसावी येथील ५५ वर्षीय पुरुष , बालाजीनगर देऊळगाव राजा येथील ७० वर्षीय पुरुष , शनिवार पेठ देऊळगाव राजा येथील ६२ वर्षीय पुरुष , नागेवाडी ता जालना येथील ६२ वर्षीय पुरुष आहे . ७४ रुग्णास डिस्चार्ज- जालना शहरातील खासगी रुग्णालय ०४ , जानकी नगर ०१ , पेंशनपुरा ०१ , अंकुशनगर ०१ , मुरारीनगर ०१ , लक्ष्मीनारायणपुरा ०२ , रामनगर पोलीस कोलनी ०१ , गोकुळधाम ०२ , काद्राबाद ०१ , रामनगर ०१ , सदर बाजार ०१ , यशवंत नगर ०१ , मिशन हॉस्पिटल परिसर ०१ , श्री नगर ०१ , अग्रसेन नगर ०१ , क्रांतीनगर ०१ , महिको कोलनी ०३ , राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ मधील ३६ , घनसावंगी ०१ , भोकरदन ०१ , माळीपुरा बुलढाणा ०१ , सावता माळी नगर बुलढाणा ०१ , दैठणा ता घनसावंगी ०१ , परतुर ०१ , आष्टी ता परतुर ०१ , लालवाडी ०१.पैठण ०१ , जामवाडी ०१ , जुना मोंढा परतुर ०३ , बावने पांगरी ०१ एकूण ७४ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलीआहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक