Breaking News
जालना जिल्हाशेतीविषयक

जालना जिल्ह्यात ६१ टक्केच पीककर्ज वाटप -२४ शाखा व्यवस्थापकावर कारवाई चे निर्देश

न्यूज जालना ब्युरो दि २४ – शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जालना जिल्ह्यात 61 टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. अद्यापही 39 टक्के पीक कर्जाचे वाटप करणे बाकी आहे.जिल्ह्यात असलेल्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया व युनियन बँक या दोन बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अत्यंत कमी प्रमाणात कर्जाचे वाटप केल्याचे  निदर्शनास आले आहे जालना जिल्ह्यात एसबीआयच्या 20 व युनियन बँकांच्या चार शाखा आहेत.ज्या शाखांनी उद्दिष्टपेक्षा कमी कर्जवाटप केले आहे. अशा शाखेतील व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचे निर्देश देत जिल्ह्यातील एकही गरजू शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 666 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली असून  1 लाख 58 हजार 455 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच त्याचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगत 2 लाख रुपयांच्या वर थकबाकी असलेल्या शेतक-यांच्या तसेच वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तातडीने बँकेला सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया खताचे मुबलक प्रमाणात वाटप व्हावे यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.(फोटो प्रतिकात्मक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक