Breaking News
भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

मधुकर सहाने : भोकरदन  भोकरदन तालुक्यात ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मुग, उडीद, मक्का, कपाशी, सोयाबीन, बाजरी, भुईमूग , तेल वर्गीय पिके व इतर पिकांचे सततच्या संततधार पडणाऱ्या पावसाने अतोनात नुकसान झाले असून यामध्ये पशुधनाचेही नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून अगोदरच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान मोरेश्वर खरेदी विक्री संघ भोकरदन ने खरेदी केलेल्या मका मध्ये शेतकर्‍यांची मका खरेदी न करता व्यापारी व धनाढ्य शेतकर्‍यांचीच मका खरेदी केलेल्यामुळे सामान्य शेतकर्‍यांचे अतोनात हाल झाले आहे. भोकरदन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व तालुक्यातील शेतकरी बाधंवाना नुकसान भरपाई द्यावी,असे अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर तालुका अध्यक्ष ञिबंकराव पाबळे, विश्वास वाघ, रामदास वाघ, सोपान सपकाळ, शेख मसूद सौदागर, भाऊसाहेब सोळुंके,रामदास शिंदे, सलीम पठाण, साळुबा लोखंडे इत्यादी शेतकरी कार्यकर्ते यांच्या सह्या आह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक