भोकरदन तालुका

राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा युवक काॅंग्रेस चे प्रदर्शन

मधुकर सहाने : भोकरदन

आज झालेल्या अखील भारतीय काॅंग्रेस कमिटी कार्यसमितीच्यी बैठकित मा.सोनिया गांधी यांनी आपल्या राजिनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता.त्या पार्श्वभूमिवर जालना जिल्हा युवक काॅंग्रेस च्या वतिने गांधी कुटूंबीयांनीच अध्यक्ष पदावर रहावे किंबहूणा राहूल गांधी यांनीच पक्षाध्यक्ष व्हावे या मागणी साठी राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ सोशल डिस्टंसिंग चे पालन करत प्रदर्शन केले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच देशाच्या जडण-घडणीत गांधी कुटूंबीयांचे योगदान देशाला विसरून चालणार नाही.राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदच नव्हे तर देशाचे पंतप्रधानपद भूषवावे.गांधी कुटूंब हे देशाच्या डी.एन.ए मध्ये आहे.देशाची सार्वभौमता व एकता टीकवायची असेल तर गांधी घराण्या शिवाय पर्याय नाही.असे जिल्हा युवक काॅंग्रेस चे अध्यक्ष राहूल देशमुख यांनी या वेळी सांगीतले यावेळी महेश दसपुते,जफर शहा,दादाराव भोंबे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक