परतूर तालुका

विजवाहक तारेला शॉक सर्किट होऊन ऊसाला आग,लाखोंचे नुकसान

आष्टी (प्रतिनिधी) परतूर तालुक्यातील गोळेगाव शिवारातील एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या विज वाहक तारेच्या पोलवर शॉक सर्किट होऊन आग लागल्याने लाखो रुपयांचे ऊस पिकाचे नुकसान झाल्याची घटना नुकतीच घडली असून याबाबत विज वितरण कंपनी कडून पंचनामा करण्यात आला आहे.


याविषयी अधिक माहिती आशी की,गोळेगाव येथील शेतकरी भाऊराव रावसाहेब तौर यांच्या गट नंबर 35 मधून महावितरणचा विजवाहन करणारे विजेचे पोल गेलेले असून त्या पोलवरून विज प्रवाह जोडण्यात आलेला आहे,शेतातून जाणाऱ्या पोलवरील तारा लोंबकळत असल्याने व महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पोलवर असलेल्या लोखंडी चैनलचे बोल्ट ढीले झाल्याने शॉक सर्किट होऊन अचानक पणे ऊस पिकांत आग लागली या आगीत शेतकरी भाऊराव रावसाहेब तौर यांचा दिड एक्कर ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तजवळपास दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वाया गेला असल्याने याबाबत महावितरण कडून काही मदत मिळेल का अशी अपेक्षा असून याबाबत महावितरणचे लाइनमन जि.एम.धुमाळ यांच्या मार्फत जळालेल्या पिकाचा पंचनामा देखील करण्यात आला आहे पंचनाम्यात शेतकरी भाऊराव तौर यांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक