भोकरदन तालुका

भोकरदन कोविड सेंटरला योगा शिक्षकाची गरज : केशव जंजाळजंजाळ यांच्या पुढाकाराने सुविधेतही पडली भर

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन येथील कोविड सेंटर ला आज रोजी २० पेशंट असून या सेंटरला शहर व ग्रामीण भागातील महिला पुरुष लहान मुले आहेत या कोविड सेंटरला डाॅ.सी.आर, चंदेल असुन तहसीलदार संतोष गोरड यांच्या आदीपत्य खाली हे सेंटर चालू आहे.

10 दिवस या ठिकाणी कोरोना पाॅजिटिव रुग्णांना ठेवले जाते त्यांच्या राहण्याची व्यवस्था जेवण नाष्टा दिला जातो.पण या ठिकाणी गरम पाणी ची सुविधा नव्हती ,लोकजागर संघटनेचे अध्यक्ष केशव जंजाळ हे कोरोना ग्रस्त झाल्या मुळे ते या आंबेडकर वसतिगृहात दाखल झाले येथील परिस्थिती त्यांच्या लक्षात आली त्यांनी तहसीलदार संतोष गोरड व डाॅ. चंदेल यांना कळवला आणी सुविधा उपलब्ध करून द्या नसता मला येथेच लगेचच उपोषण सुरू करावे लागेल हे समजता च या ठिकाणी गरम पाणी ची व्यवस्था करण्यात आली अंडे ड्रायफ्रूट रुग्णांना मिळाले कर्मचारी सुद्धा पीपी किट नव्हते त्यांना किट उपलब्ध करून दिले पूर्ण परिसर स्वच्छ धुवून साप कऱण्यात आला केशव जंजाळ यांनी रुग्णांना कोरोना ची भिती डोक्यातून काडून फेका रोज सकाळी 7 ते 8 या वेळेत योग व मार्गदर्शन करतात त्यामुळे रुग्णांना खूप फायदा झाला केशव जंजाळ यांच्या मता नुसार जनतेने आता न घाबरता कोरोना शी दोन हात कसे करावे या साठी काही टिप्स रुग्णांना दिल्या योग करणे ही आता काळाची गरज झाली आहे कोरोना रुग्णांना च्या बाबतीत। अफवा पसरवून धाक निर्माण झाला आहे तो धाक डोक्यातुन काढायचा असेल तर रोज सकाळी योग करा निरोगी रहा हा संदेश दिला ते पुढे म्हणाले सुट्टीच्या दिवशी येथे दोन झाडे मी लावणार आहे व कर्मचारी वर्ग यांना जो त्रास या सेंटरला होत आहे तो थांबला पाहिजे या साठी प्रयत्न करणार असल्याचे जंजाळ यांनी सांगितले आहे.

आता कोरोना ग्रस्थांना गोळ्या औषधांसोबत योगा व मार्गदर्शनाची गरज असुन भोकरदन कोविड सेंटरला योगा शिक्षक नेमवुन रोज या रुग्णांकडुन योगा व कोरोनाविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. : केशव जंजाळ : लोकजागर संघटना अध्यक्ष भोकरदन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक