बदनापूर तालुका

परीक्षा शुल्क परत करा व शैक्षणिक शुल्कात तीस टक्के कपात करा – अभाविप बदनापूर

किशोर शिरसाठ/ बदनापुर दि २५  – सध्या कोरोनाच्या या महामारीने जगभर आपले थैमान घातले आहे. सर्वच महत्त्वाच्या क्षेत्राप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रावर ही याचा मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी व पालकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. विद्यार्थी व पालकांच्या या समस्या जाणुन घेत अभाविप बदनापुर शाखेच्या वतिने तहसिलदार साहेबांना विविध शैक्षणिक समस्यांबाबत निवेदन देण्यात आले व शैक्षणिक सध्य परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.


यावेळी निवेदनामध्ये खाजगी विद्यापिठांची वाढत असलेल्या संख्या व विद्यार्थांची होणारी आर्थिक लुट बघता या वर विद्यापिठ नियंत्रक कायदा ठरवण्यात यावा व विद्यापिठांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे ३०%  शैक्षणिक शुल्क कपात करण्यात यावी तसेच प्रवेश नोंदणी करीत असतांना एकुन शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्कच आकारण्यात यावी.अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत अशा सर्व वर्षांच्या विद्यार्थांची परीक्षा शुल्क विद्यापिठांनी परत करावी.
कोरोनाच्या या काळात पालकाची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे, अशा वेळी महाविद्यालयीन प्रशासनाने शैक्षणिक शुल्कात सक्ती करु नये व उर्वरित शुल्क भरण्यासाठी चार टप्पे द्यावे.


अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली.यावेळी तालुका प्रमुख संदीप दाभाडे, अजय कोल्हे, रुद्र काटकर, विष्णु काटकर,योगेश शिंदे,तुळशीराम दाभाडे, राजु कोल्हे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक