Breaking News
बदनापूर तालुका

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराचे नुकसान भरपाई द्या !

बदनापूर प्रतिनिधी: (किशोर सिरसाठ) : बदनापूर तालुक्यामध्ये यंदाच्या पावसाळ्या ऋतूमध्ये अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण शेतकऱ्याची पिकाची अतोनात नुकसान झाले आहे सदर्भित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई ची मागणी होत आहे

दरम्यान नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हा आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेला आहे एकीकडे कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव असल्याने आर्थिक चक्र आर्थिक चक्र स्थिर झाले आहे. आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती म्हणजे मोठया प्रमाणत अतिवृष्टीने केलेले नुकसान न भरून निघणारे आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची भरपाईची दखल घेऊन तातडीने पिकाचे पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने बदनापूर तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन सादर करत या बाबत संघटनेने शेतकऱ्या बाबत पुढाकार घेऊन एक सामाजिक बांधिलकी राखली आहे. तसेच संघटनेच्या वतीने शेतकरयांचे नुकसान झालेल्या पिकांचे फोटो ही तहसील कार्यालय मुख्य प्रवेशद्वारात लावण्यात आले आहे. निवेदन सादर करताना यावेळी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालय दणाणून सोडले होते. यावेळी संघटनेचे शेतकरी आघाडी चे प्रदेशाध्यक्ष पंकज ज-हाड, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष किरन चौधरी,युवक जिल्हा कार्याध्यक्ष राम मडके, बंजारा आघाडी तालुकाध्यक्ष सचिन पवार, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष दादाराव ताडगे,युवक उपाध्यक्ष विलास गव्हाड, रुद्रा काटकर,संदिप दाभाडे अजय कोल्हे, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक