जालना तालुका

जि.प.पाथ्रूड तांडा शाळेत पोषण आहाराचे वाटप


सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) शाम गिराम
जालना तालुक्यातील पाथ्रूड तांडा केंद्र सावंगी तलान येथील शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.पालकांना शाळेत बोलावून सुरक्षित अंतर ठेवून पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.


कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या शाळा बंद आहेत.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन मिळणारा पोषण आहार बंद असल्याने शासनाकडून प्राप्त झालेला तांदूळ व धण्यादी माल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी प्राप्त झालेला शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश दिले.त्यानुसार पाथ्रूड तांडा येथील शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बंडू राठोड,श्याम राठोड,दिलीप राठोड,विष्णू पवार,संदीप राठोड,सहशिक्षक सतीश श्रीखंडे,शाळेचे मुख्याध्यापक नारायण माहोरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक