संपादकीय

लाळेचे नमुने घेणारा पॉझिटिव्ह होतो तेव्हा….व अनुभवलेला कोरोना .

न्यूज जालना ब्युरो दि २६ कोरोनाबाबत समाजात असलेली वृत्ती व बघण्याचा दृष्टीकोन याबाबत मंठा तालुक्यातील आरोग्य विभागात काम करणारे व तालुक्यातील १०० ते १५० संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने घेणारा आरोग्य सेवक आनंद उर्फे सुजीत वसंतराव वाघमारे हे पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनि न्यूज जालना शी शेअर केलेला त्याचा अनुभव त्याच्याच भाषेत …. मी कोरोना बाधित मित्रांनो मी आनंद उर्फे सुजीत वसंतराव वाघमारे प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ येथे आरोग्य सेवक व अतिरिक्त आरोग्य सहाय्यक या पदावर आहे. कोरोना ही जागतिक माहामारी आपल्या भारत देशात जोरदार पणे पसरत आहे . एक आरोग्य कर्मचारी मी दिनाक 18 मार्च पासून ढोकसाळ अंतर्गत येणारे 44 गावात जाऊन मुंबई / पुणे आदी ठिकाणा वरुन आलेल्या 2 ते 3 हजार व्यक्ती ची प्राथमिक तपासणी केली ज्या ठिकाणी त्याना त्याचे नातेवाईक गावात प्रवेश देत नव्हते .त्याचे जवळ ही जात नव्हते त्या ठिकाणी मी व आमच्या सर्व आरोग्य कर्मचारेनी त्यांची तपासणी केली व त्याना मानशीक आधार दिला .. नवीन नवीन तर आम्हाला कुठल्याही सुविधा उपलब्ध नव्हते . पण माझे तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिपक लोणे व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ संतोष कडले यांनी आम्हा सर्व आरोग्य कर्मचारे ना मोलाचे मार्गदर्शन केले व पाठबळ दिले .त्याच प्रेरणेने ज्या वेळी मंठा ग्रामीण रुग्णालयात संशयित रुग्णाचे लाळेचे नमुने घेण्यास सुरुवात झाली त्या वेळी माझे तालुका आरोग्य अधिकारी डॉ लोणे यांनी सांगितले होते की पुढे ही वेळ ग्रामीण भागात ही येणार आहे महणून आताच शिका ।, त्याच अनुसंघाणे मी जवळपास 100 ते 150 जणांचे लाळेचे नमुने घेतले . पण कुठे कधी कसे माहिती नाही पण कोरोना चे व्हायरस ने माझे शरीरात प्रवेश केला ..एक आरोग्य कर्मचारी महणून मी मनाने फार मजबूत होतो .पण एक मुलगा .पती.वडील महणून मलाही इतरा सारखी माझ्या परिवाराची काळजी वाटु लागली होती ..मी कोरोना बाधित झालो आहे असे कळाले नतर जे माझे गुणगान करायचे तेच नतर माझ्या घरापासून दुर पळु लागले .येवढे काय माझे घरचे दुध बंद केले .माझ्या मुलाला कोणी किराणा सामान दिई ना .माझ्या पत्नी ला कोणी बोलणे सर्व जण माझ्या परिवाराकडे वेगळे नजरेने पाहत होते .जणू कोणते मोठे पाप केले आहे, यात माझा किंवा परिवाराचा काय दोष होता .मला तर जनसमुदाय ची सेवा करतांना लागण झाली होती… तुम्ही आम्ही सर्व गर्वाने सागतो समाज व देश पुढे जात आहे प्रगती करत आहे कुठे झाली प्रगती ?? अशा कढीण प्रसंगात ज्यांनी मला व माझ्या परिवाराला धीर दिला पाहिजे होता .तेच दुर जाऊन माझ्या परिवाराला उचला असे माझे वरिष्ठ अधिकारे कडे बोलु लागले ..सागा ना झाली प्रगती देशाची व समाजाची झाली का. अशा कढीण प्रसंगात मी मनाने फार खचलो होतो पण माझ्या परिवाराने .सर्व मित्रांनी विशेष 1999 बँचचे .सर्व सहकार्य नी काही पत्रकार मित्रानी आणि विशेष माझे दोन आर्दश व मी ज्यांना माझे मित्र मानतो असे डॉ. संतोष कडले व डॉ. दिपक लोणे यांनी मला खुप मोठा मानशीक आधार दिला व मला या आजारातून बाहेर काढले . आज मी कोरोना मुक्त झालो पुर्वी सारखे डयुटीवर आहे .पण मनात खंत वाटते समाज व इतर कधी सुधारणार आहेत .. सर्वाना विनंती आहे की कोणत्याही कोरोना बाधित व्यक्ती व त्याचे परिवाराकडे वेगळे नजरेने बघू नका . त्यानी मुद्दाम हुण कोरोना ला आमंत्रण दिले नाही ते ही माणसे आहेत त्याचे ही भावना आहेत त्याचे ही मानसिक खच्चीकरण होते … काही चुकले क्षमा असावी पण समाजाने विचारात प्रगती केली पाहिजे … धन्यवाद ..।।।। आपला आनंद उर्फे सुजीत वसंतराव वाघमारे आरोग्य सेवक ढोकसाळ 8275231726

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक