जालना तालुका

संततधारमुळे द्राक्ष,कपाशी,मुग,तुर,मिरची चे अतोनात नुकसान

जालना तालुक्यामध्ये ठिक-ठिकाणी द्राक्ष,कपाशी,मुग,तुर,मिरची इत्यादी पिकाचे पावसामुळे नुकसान:

जालना न्यूज /तुकाराम राठोड दि २६

जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील चार ते पाच शेतकऱ्यांचे संततधारमुळे पिकाचे नुकसान झाले आहे यात द्राक्ष, कपाशी, मूग,तूर,मिरची चा समावेश आहे

सविस्तर वृत्त असे की,जालना तालुक्यातील नंदापुर येथिल छायाबाई जनार्धन उबाळे वय ३० वर्ष यांनी २००७-०८ या वर्षी चार एक्कर द्राक्षाची लागवड केली होती.मात्र यंदा कुठे रिमझीम तर कुठे मुसळधार पावसामळे द्राक्षाच्या झाडावरील संपुर्ण पाणे गळून पडली आहे.

त्यामुळे या बागाईत दार शेतकऱ्यांच्या पिकाचे फार अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान गजानन बापुराव कुरधने वय ४० वर्ष यांच्याकडे दोन एक्कर द्राक्ष असुन सतत पडणाऱ्या पावसामुळे झाडावरील पाणे गळून पुडली आहे. व उमा प्रदीप उबाळे दोन एक्कर कपाशी लागवड केली होती पण पावसामुळे कपाशी वरिल फुलांची मोठ्या प्रमाणामध्ये पाती गळती होऊन,पिवळी पडली आहे त्यावर मावा,तुडतुडे व ईतर व्हायरसने ग्रासले आहे.तसेच

कैलास आनंदराव सोळुंके यांनी एक एक्कर मुगाची पेरणी केली होती,पण सतत पडणाऱ्या पावसामुळे मुगाच्या शेंगाला कोंब फुटले आहे व काही ठिकाणी मुग सडुण गेली आहे.आणी

मिरा सुनिल उबाळे यांनी आठ एक्कर मध्ये-चार एक्कर द्राक्ष,एक एक्कर मिरची,दोन एक्कर मुग,एक एक्कर तुरीची पेरणी केली होती.मात्र आवकाळी पावसांने सर्व पिके धोक्यात आली असुन, तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी.अशी मागणी शेतकऱ्यांने यावेळी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक