Breaking News
जालना जिल्हा

कोरोना अपडेट : जालना जिल्ह्यात आढळले ६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

न्यूज जालना ब्युरो दि २६ –जालना जिल्ह्यात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वाढ होत असताना बुधवारी २६ रोजी ६६ रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . यामध्ये अॅन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या २६ रूग्णांचा समावेश आहे .दरम्यान एकूण रूग्णसंख्या आता ४२८९ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत एकूण १२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे . ३०४४ रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . दरम्यान १११६ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत .   जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार आज दि . २६/०८/२०२० रोजी ०२ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण तिर्थपुरी ता घनसावंगी येथील ७० वर्षीय महिला व जालना शहरातील करवानगर परिसरातील ६७ वर्षीय पुरुष आहे .   जालना शहरातील घनसावंगी ०३ , सामान्य रुग्णालय परिसर १८ , भोकरदन ०१ , खासगी रुग्णालय ०५ , प्राथमिक आरोग्य केंद्र शेलगाव ०४ , परतुर ०१ , डोणगाव ०१ , माहोरा ०२ , वरूड ०३ , अंबड ०१ , नेर ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ४० व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे २६ व्यक्तींचा अशा एकुण ६६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्हआला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .   दरम्यान जालना शहरातील समर्थ नगर ०१ , चमन ०१ , समर्थ नगर ०२ , वाल्मीक नगर ०१ , शांकुतलनगर ०१ , गणपती गल्ली ०१ , सराफनगर ०१ , नुतन वसाहत ०५ , लक्ष्मीकांत नगर ०१ , एस आर पी एफ ०४ , बेथल ०१ , लालवाडी १२ , दुसरबीड ०१ , मांडवा ता बदनापुर ०१ , राजपुत मोहल्ला अंबड ०१ , खामगाव ०१ , बावणे पांगरी ०४ , शेलगाव ०१ , फत्तेपुर ० ९ , देशमुख गल्ली भोकरदन ०३ , मंठा ०८ , एकूण ६० रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलीआहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक