भोकरदन तालुका

खोटी तक्रार देऊन उपोषनास बसणाऱ्याच्या विरोधात चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करण्याची राजपूत याची मागनी

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील गट नंबर ४९० मधील मिळकत क्रमांक ३६८ च्या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत लिपीक बहादुरसिंग राजपुत व त्यांचा मुलगा जयपाल राजपुत यांनी व गावातील देवाजी येडुबा लहाने झुंबरबाई जोनवाळ , आनंदा पेमा पांढरे , गणेश पेमा पांढरे व कार्यरत ग्रामसेवक यांनी संगणमत करुन व आर्थिक व्यवहार करून जागेच्या कागदात खाडाखोड केली व जागेची आफरा तफर व मा.कोर्टाचा अवमान केला

असा आरोप करून गटविकास आधिकारी पंचायत समिती भोकरदन यांच्याकडे आव्हाना ग्रामपंचायत चे लीपीक व इतर सर्वांवर कठोर कार्यवाही व्हावी म्हणून रामलाल नंदराम पांढरे यांनी अर्ज दिला आहे ३०आगस्ट पर्यत चौकशी न झाल्यास आमरण उपोषनाचा इशारा दिला आहे .

त्यावर ग्रामपंयतचे निवृत लिपीक बहादुरसिंग राजपूत ह्यांनी ह्या प्रकरणात मी व माझा मुलगा दोषी नसून आमच्या नावाची रामलाल नंदराम पांढरे व त्यांचा मुलगा ईश्वर पांढरे खोटी बदनामी करीत आहे . जर ह्या प्रकरणात आम्ही दोषी आढळून आल्यास आमच्यावर रितसर कार्यवाही व्हावी आणी जर ह्या प्रकरणात आम्ही दोषी नसलो तर खोटी तक्रार करनार रामलाल नंदराम पांढरे व त्यांचा मुलगा ईश्वर रामलाल पांढरे ह्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही व्हावी म्हणून राजपुत यांनी तालुका दंड अधिकारी गटविकास अधिकारी व पोलीस निरिक्षक भोकरदन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक